नेहरू आणि बोस : राजकारणाने त्यांच्यातील मैत्री घडवली होती, राजकारणामुळेच ती तुटली!
नेहरू-बोस या परस्परभिन्न प्रवृत्तीच्या व्यक्तींचं आणि त्यांच्या वैचारिक भूमिकांचं विश्लेषण करायचा प्रयत्न या पुस्तकात आहे. ते मित्र होते, पण ते एकमेकांचे सुहृद मात्र कधीच नव्हते. वैयक्तिक आपुलकी आणि ममता यांपेक्षाही राजकारणाने त्यांच्यातील मैत्री घडवली होती. राजकारणामुळेच ही मैत्री तुटली. राजकीय भेदाभेदांपलीकडे जाऊनही टिकून राहण्यातले हे मैत्रीसंबंध नव्हते. या दोघांमध्ये शत्रुत्वाची भावनाही नव्हती.......